आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुरैना - आंतरराष्ट्रीय अॅथलेटपटू असलेल्या पानसिंह तोमरच्या बंडखोरीपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण असलेल्या ‘पानसिंह तोमर’ या चित्रपटाने देशभर यश मिळवले. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट ब-यापैकी गल्ला जमवण्यात यशस्वी ठरला. त्यातील पानसिंहच्या भूमिकेसाठी अभिनेता इरफान खानला श्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला; परंतु पानसिंहच्या पत्नी इंद्रादेवी हा चित्रपट आतापर्यंत पाहू शकलेल्या नाहीत. एकदा त्यांनी तो पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हा चित्रपट त्या पाहू शकल्या नाहीत. जुन्या आठवणींचा त्रास होऊ लागल्याने टीव्हीच बंद करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटांतील दृश्ये पाहून आठवणी जाग्या होतात. अन्याय, उपेक्षा झाल्याची भावना बळावत जाते व पुढील चित्रपट पाहणे राहूनच जाते, असे इंद्रादेवींनी सांगितले.
चित्रपट बघण्याची त्यांची इच्छा असूनही ती आजवर पूर्ण होऊ शकलेली नाही. वर्ष झाले तरीही चित्रपट पाहण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, असे 75 वर्षीय इंद्रादेवी म्हणाल्या. त्या सध्या त्यांचा मुलगा सौरामसिंहसोबत बबिनामध्ये राहतात. ते लष्करातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. ते सांगतात की, ‘पानसिंह तोमर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो आईला घरीच दाखवण्याचा प्रयत्न केला; परंतु पहिल्या 20 मिनिटांचा चित्रपट पाहिल्यावर आईचे डोळे अश्रूंनी भरले व पुढचा चित्रपट त्यांनी पाहिला नाही. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी हा चित्रपट आम्हालाही पाहू दिलेला नाही. सौरामसिंह सांगतात की, आंतरराष्ट्रीय अॅथलेटपटू असूनही आपले वडील सन्मान व नावाचे भुकेले नव्हते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.