Home | Feature | Parde Ke Peeche

जाणून घ्या कसा आहे 'बेवकूफिया'

Jay Prakash Chouksey | Update - Mar 18, 2014, 04:51 PM IST

आदित्य चोप्रा, नूपुर आस्थाना आणि लेखक हबीब फैजल यांचा ऋषी कपूर, सोनम, आयुष्मान खुराणा अभिनीत ‘बेवकुफियां’ अत्यंत मनोरंजक आणि बुद्धिमत्तेने बनवलेला चित्रपट आहे. हबीब फैजल यांना आर्थिक उदारीकरणातून जन्मलेल्या नोकरदार मध्यमवर्गीयांची चांगली ओळख आहे. तरुणाईची मानसिकता, त्यांची जीवनशैली, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सगळे काही चांगल्याप्रकारे रेखाटले आहे.

 • Parde Ke Peeche
  आदित्य चोप्रा, नूपुर आस्थाना आणि लेखक हबीब फैजल यांचा ऋषी कपूर, सोनम, आयुष्मान खुराणा अभिनीत ‘बेवकुफियां’ अत्यंत मनोरंजक आणि बुद्धिमत्तेने बनवलेला चित्रपट आहे. हबीब फैजल यांना आर्थिक उदारीकरणातून जन्मलेल्या नोकरदार मध्यमवर्गीयांची चांगली ओळख आहे. तरुणाईची मानसिकता, त्यांची जीवनशैली, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सगळे काही चांगल्याप्रकारे रेखाटले आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंह अभिनीत ‘दो दुनी चार’ प्रमाणेच ‘बँड बाजा बारात’, ‘इश्कजादे’ आणि ‘बेवकुफियां’ तरुणाईच्या मापदंडावर खरा उतरला. आता त्यांच्या ‘दावत ए इश्क’पासून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
  असो, ‘बेवकुफियां’मधील तरुण नायक आणि नायिका उच्च शिक्षित आणि नोकरदार लोक असतात. बाजार त्यांच्या विचाराचे केंद्र आहे. दोघेही खूप पैसा कमावतात आणि एकमेकांशी खूप प्रेम करतात. नायिकेचे वडील प्रामाणिक आयएएस अधिकारी असतात. तीस दिवसांनी ते निवृत्त होणार असतात. मुलीने पसंत केलेला मुलगा त्यांना आवडत नसतो, कारण त्याला तिच्यापेक्षा सात हजार कमी पगार असतो. फक्त प्रेमाने जगता येत नाही, तर जीवनात पैसा खूप महत्त्वाचा असतो, असे त्यांचे मत असते.
  खरे तर, हबीब फैजल आपल्या पात्रांची मानसिकता खोलवर जाऊन रचतात. या प्रामाणिक अधिकार्‍याने आपल्या समकालीन भ्रष्ट अधिकार्‍यांना कोट्यवधीरुपये कमवताना पाहिलेले असते आणि आपल्या प्रामाणिकपणाची किंमत केली गेली नाही म्हणून त्यांना चीडदेखील असते. त्यामुळे ते आपल्या मुलीच्या भविष्याविषयी सजग असतात.
  पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा अधिक माहिती...

 • Parde Ke Peeche
  या चित्रपटात आर्थिक मंदी खलनायक आहे, त्यामुळे त्याची नोकरी जाते. नायिकेने लग्नाला होकार दिल्यामुळे तो तिच्यापासून बेरोजगार होण्याची गोष्ट लपवतो. त्याच्या बेरोजागारीच्या काळात नायिका त्याला आर्थिक मदत करते. मात्र, बेरोजगारी पैसे नसल्यापर्यंतच र्मयादित नसते, तर एका वेगळ्याच प्रकारच्या नैराश्याने तो वेढला जातो. खरे तर, बेरोजगारी एक कटुता आहे, त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दरम्यान, सेवानिवृत्त अधिकार्‍याला नायक चांगला माणूस असल्याचे कळते आणि ते रुसलेल्या प्रेमी जोडप्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. शेवटी प्रेमाचा विजय होतो. 
 • Parde Ke Peeche
  हबीब फैजल यांनी लिहिलेले संवाद मनोरंजक असण्याबरोबरच खोलवर संदेशदेखील देतात. उदा. एक मित्र दुसर्‍याला म्हणतो की, तुला बेरोजगारीची सवय पडली आहे. संकट आल्यावर योग्य माणसाने कमी पदाचीदेखील नोकरी स्वीकार करायला हवी. संपूर्ण चित्रपट मनोरंजक आहे. सगळ्यांनीच चांगले काम केले आहे. मात्र, ऋषी कपूरने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांच्या सारखे कोणी नाही. या चित्रपटात त्यांचे पात्रच चांगल्या प्रकारे रचण्यात आले आहे. त्यांनी स्वाभाविक पद्धतीने या पात्राला सजीव करून टाकले आहे. खरे तर, ऋषी कपूरदेखील एक सवय आहे, ती आपल्याला सोडावी वाटत नाही. ‘विकी डोनर’नंतर खुराणा वाट विसरला होता आणि यात परत आला आहे. ‘रांझना’तून आत्मविश्वास घेऊन सोनम आणखी उजळली आहे. 
 • Parde Ke Peeche
  आर्थिक उदारीकरणातून निर्मित झालेल्या बाजाराने पहिल्यांदाच आपल्या ग्राहकालादेखील जन्म दिला आहे. प्रकाश आणि आमोद-प्रमोदचे नवे जग उभारले आहे. ही सगळी समृद्धी ज्या वस्तूवर टिकलेली आहे, ती चलायमान आहे आणि खेळ बदलायला उशीर लागत नाही. खरे तर, या विकास आणि समृद्धीचे सत्य उघड होण्यात खूप वेळ लागेल आणि यात रमलेले लोक तिथे जातात जिथे त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. काही दिवसांपूर्वी वुडी एलेन यांनी एक चित्रपट बनवला होता, ज्यात आर्थिक मंदीने तुटलेल्या लोकांच्या जीवनाचे वर्णन आहे. ‘बेवकुफियां’ फक्त संकेत करतो, खरे तर बाजाराचा भाव वर-खाली झाल्याचा परिणाम सामान्य माणसांवर होतो. या विकासाचे काही आजारदेखील आहेत, या नवीन जीवनशैलीत जिम आहे. मात्र, एखादी आगळी-वेगळी उणीव मनाला वेढलेली असते. असो, हा शुद्ध मनोरंजन करणारा आणि प्रेक्षकांना हसवणारा चित्रपट आहे. 

Trending