आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti Sidharth Promoted Their Film Hasee Toh Phasee

'हंसी तो फंसी'च्या प्रमोशनसाठी परिणीती आणि सिध्दार्थ पोहोचले दिल्लीत, पाहा PCS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरातील हॉटेल शांग्री-ला एरोसमध्ये सोमवारी परिणीत चोप्रा आणि सिध्दार्थ मल्होत्रा त्यांच्या 'हंसी तो फसी' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. परिणीती आणि सिध्दार्थने चुलबुली अंदाजात बरीच धमाल-मस्ती केली. दोघांनी या दरम्यान त्यांच्या सिनेमाच्या गाण्यावर परफॉर्मेन्स दिला. 'हंसी तो फसी' हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. ज्यामध्ये परिणीती वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे.
माध्यमांमसोबत सिनेमाविषयी बोलताना परिणीतीने सिनेमाच्या शुटिंगचा अनुभव शेअर केला. तिने सांगितले, 'सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आम्ही खूप धमाल केली. सिध्दार्थसोबत पहिल्यांदा काम करताना मज्जा आली. सिध्दार्थ त्याच्या कामाला एन्जॉय करतो. सिनेमाच्या सेटवरील वातावरण हसते-खेळते राहण्यासाठी तो नेहमी कुणाची ना कुणाची मजाक करतो.' सिध्दार्थनेही सिनेमाच्या शुटिंगवेळचे अनुभव सांगितले, 'तो खूप आनंदी आहे, की तो या सिनेमाचा एक भाग आहे. ज्यांनी हा सिनेमा बघण्याचा निर्णय घेतला आहे ते सर्वच या सिनेमाचा नक्कीच आनंद घेतील.'
'हंसी तो फसी' सिनेमा विनील मैथ्यू यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक रोमाँटिक सिनेमा आहे. करण जौहर आणि अनुराग कश्यपने सिनेमाची निर्मिती केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्रमोशनसाठी आलेल्या सिध्दार्थ आणि परिणीतीची काही खास छायाचित्रे...