आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pariniti Chopra And Aditya Roy Kapoor Together In Next Film

'आशिकी बॉय' सोबत 'इश्कजादी'चा रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी सिनेमात आदित्य रॉय कपूरसोबत रूपेरी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. 2011 मध्ये प्रदर्शित ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी परिणीती चोप्रा यशराज बॅनरच्या सिनेमात काम करत आहे. या सिनेमात ती ‘आशिकी 2’ चा आशिक आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन हबीब फॅजल करणार असून याची कथादेखील त्यांनीच लिहिली आहे. परिणीतीने याआधी हबीबच्या ‘इश्कजादे’ मध्ये काम केले आहे. त्यासाठी तिला स्पेशल मेन्शन नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. सप्टेंबरपासून सिनेमाचे शूटिंग सुरू होणार असून तो 2014 मध्ये प्रदर्शित होणार आहे.