Home »Top Story» Pariniti Chopra Will Say Hamara Bajaj

परिणीती म्हणेल, 'हमारा बजाज'

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2013, 10:43 AM IST

  • परिणीती म्हणेल, 'हमारा बजाज'

'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री परिणीती चोप्राकडे सध्या सिनेमांची रीघ लागली आहे. 'इश्कजादे' या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयामुळे तिला ही संधी मिळाली आहे.

सध्या सुजित सरकार आपल्या 'मद्रास कॅफे' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. लवकरच तो याचे चित्रीकरण सुरु पूर्ण करुन 'हमारा बजाज' या सिनेमाचे चित्रीकरण सुरु करणार आहे. या सिनेमासाठी आयुष्मान खुराणाचे नाव हिरो म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हिरोइनसाठी आधी यामी गौतमचे नाव फायनल झाले होते. मात्र आता परिणीती चोप्राच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

'इश्कजादे' सिनेमा पाहिल्यानंतर सुजितने 'हमारा बजाज'साठी परिणीतीला घेण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप परिणीतीसोबत चर्चा झालेली नाही. सुजितच्या मते, आयुष्मान आणि परिणीतीची जोडी पडद्यावर धूम करेल.

Next Article

Recommended