आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REMEMBRANCE: गँगरीनने त्रस्त होती परवीन बाबी, कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मजबूर', 'दीवार', 'अमर अकबर ऍन्थनी', 'खुद्दार', 'काला पत्थर', 'शान' यासारख्या सिनेमांत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नायिका म्हणून समर्थपणे स्वतःच्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारी अभिनेत्री परवीन बाबी हिचा आज (20 जानेवारी) नववा स्मृतीदिन आहे. ऐंशीच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परवीन बाबीला ओळखले जात होते. 22 जानेवारी 2005 रोजी परवीनने या जगाचा निरोप घेतला. आपल्या शेवटच्या दिवसांत ती एकाकी आयुष्य व्यतित करत होती. एक व्हिल चेअर, काही औषधं, पेंटिंग्स आणि कॅनव्हास हेच तिचे शेवटच्या दिवसातील सोबती होते.
परवीन डायबिटीज आणि गँगरीनने पीडित होती. त्यामुळे किडनी आणि शरीरातील काही अवयवांनी काम करणे बंद केले होते. divyamarathi.comकडे परवीन बाबीच्या शेवटच्या क्षणाची काही छायाचित्रे आहेत. परवीनचा मृतदेह तिच्या राहत्या घरात विपन्नावस्थेत आढळून आला होता. तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. तो पर्यंत घरांतच तिचा मृतदेह पडून होता.
अज्ञातवासात आयुष्य व्यतित करत होती परवीन : 2002 मध्ये आईच्या निधनानंतर परवीनचे मानसिक संतूलन बिघडले होते. ती एकटीच राहू लागली होती. कधीकधीच ती चर्चमध्ये दिसायची.
परवीनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीपासून परवीनने नातेवाईंकासोबत संपर्क तोडला होता. याशिवाय वीस वर्षे परवीनचे शेजारी राहिलेल्या एमएस मल्होत्रा यांनी सांगितले होते, की एवढ्या वर्षांत त्यांनी परवीनला केवळ पंधरा वेळाच बघितले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा परवीन बाबीची शेवटच्या क्षणाची छायाचित्रे...