आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pay Upto R 90 Lakhs And Get Katrina Kaif To Dance At Your Wedding

या सेलिब्रिटींना लग्नात ठुमके लावायला बोलवण्यापूर्वी जाणून घ्या त्यांचा रेट चार्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अलीकडेच लंडनमध्ये झालेल्या एका हायप्रोफाईल लग्नात शाहरुख आणि कतरिनाने परफॉर्म केले. दोघांनी आपल्या नृत्याने पाहुण्यांचे मनोरंजन केले आणि लग्नाची शोभा वाढवली. यासाठी या दोघांना मोठी रक्कम मिळाली.
खरं तर बी टाऊनच्या या आघाडीच्या कलाकार तुमच्याही लग्नात ठुमके लावू शकता... हं पण यासाठी तुम्हाला तुमचा खिशा रिकामा करावा लागणार आहे.

शाहरुख खान, सलमान खान, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, ऋतिक रोशन यांसारखे बी टाऊनचे बडे स्टार्स हाय प्रोफाईल वेडिंगमध्ये ताल धरुन लाखो रुपयांची तर कधीकधी कोटींची कमाई करत असतात. सिनेमांच्या व्यतिरिक्त या कामातूनही या स्टार्सची लाखोंची कमाई होत असते.

राजकारणी, मोठे व्यावसायिक या स्टार्सना आपल्या खासगी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित करत असतात. त्यासाठी ते या स्टार्सना मोठी रक्कमसुद्धा देतात.

मात्र शाहरुख खान, ऋतिक रोशन, मलायका अरोरा, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रासह बी टाऊनचे स्टार्स या खासगी कार्यक्रमांत काही तासांच्या उपस्थितीसाठी किती रुपये घेतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ? या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींच्या रेट चार्टबद्दल सांगतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटींचा रेट चार्ट...