आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा जिया खानची खासगी छायाचित्रे, आपल्या चाहत्यांसाठी केली होती शेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री जिया खानचा मृत्यू मागील वर्षी 3 जून 2013मध्ये झाला होता. ती तिच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळली होती. जियाचा मृत्यू आमहत्या होता की हत्या याचा तपास पोलिसांना अद्याप लागलेला नाही. जियाचे शवविच्छेदन केल्यानंतरही तिच्या मृत्यूचे खरे कारण कळाले नाही. जियाची आई राबिया खान यांनी अमेरिकेच्या FBIकडून तिच्या प्रकरणासाठी मागील काही दिवसांपूर्वी मदत मागितली होती.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, 20 फेब्रुवारीला जिया खान या सुंदर तरूणीचा जन्म झाला होता. आज तिचा वाढदिवस आहे. जिया जर आज आपल्यात असती तर ती 26 वर्षांची झाली असती.
सर्वच सेलिब्रिटीप्रमाणे जियालादेखील सोशल साइट्सवर चाहत्यांना आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगणे आवड होते. ती नेहमी टि्वटरच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत होती. खासगी आयुष्यातील फोटो ती सोशल साइट्सवर नेहमी पोस्ट करत होती. जिया तिचे टि्वटर अकाउंट खरे नाव नफीसा खान नावाने चालवत होते. जियाने तिच्या अकाउंटवर मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 24 मे रोजी टि्वट करून सांगितले होते, की तिला काही दिवस या सोशल माध्यमांपासून दूर राहायचे आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, जिया खानच्या खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे. तिने ही छायाचित्रे तिच्या टि्वटर आणि दुस-या सोशल साइट्वरून चाहत्यांना शेअर केली होती. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा जिया खानची काही छायाचित्रे...