आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Ahana Deol\'s Big Fat Bollywood Wedding Had Aishwarya Rai, Deepika Padukone, Shah Rukh Khan, Ranveer Singh & Narendra Modi In Attendance

अहाना देओलच्या Wedding Receptionमध्ये पोहोचले सेलिब्रिटी, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी कन्या अहाना देओल दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरासह लग्नगाठीत अडकली. रविवारी या दोघांच्या लग्नाची ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या रिसेप्शन पार्टीला अख्खं बॉलिवूड हजर होतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बच्चन कुटुंबियांपासून ते शाहरुख खान, सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांच्यसह ब-याच सेलिब्रिटींनी अहानाच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती.
अहानाच्या रिसेप्शन पार्टीच्या निमित्ताने ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन ब-याच दिवसांनी एकत्र दिसल्या. त्यांच्यासह अमिताभ आणि अभिषेक बच्चनदेखील हजर होते. याशिवाय अमरसिंह आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा एकाच ठिकाणी दिसले.
एव्हरग्रीन रेखा यांनीही या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. यावेळी रेखा नेहमीप्रमाणेच सुंदर दिसल्या.
काही दिवसांपूर्वी शुटिंगदरम्यान जखमी झालेला किंग खान शाहरुख यावेळी काठीच्या आधाराने चालत रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचीही एकत्र हजेरी या हायप्रोफाईल पार्टीत होती.
सोनाक्षी सिन्हा आई पूनम सिन्हासह पार्टीत पोहोचली होती. तर दिया मिर्झा तिचा बॉयफ्रेंड साहिल सिंघासह पार्टीत दिसली.
अहाना आणि वैभवच्या रिसेप्शन पार्टीचा अल्बम बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...