आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Shahid Kapoor Follows In The Footsteps Of Salman Khan, Sanjay Dutt, Goes Bald For Haider

PHOTOS : शाहिदचे सलमान-संजयच्या पावलावर पाऊल, \'हैदर\'साठी करणार टक्कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सिनेमातील भूमिकेत जीव ओतण्यासाठी अभिनेते काहीही करण्यास तयार असतात. आता हेच पाहा ना, अभिनेते आपल्या भूमिकेसाठी सिक्स पॅक अॅब्स बनवतात, थरारक स्टंट्स स्वतः करतात. पण जेव्हा स्वतःच्या लूकमध्ये बदल करण्याची वेळ येते, विशेषतः टक्कल करण्याची जेव्हा एखाद्या कलाकारावर वेळ येते, तेव्हा तो त्याच्यासाठी एक मोठा निर्णय असतो. सर्वच कलाकार असं करायला तयार होतात असं नाही. पण काही कलाकार मात्र याला अपवाद ठरले आहेत.
सलमान खान, आमिर खान, संजय दत्त या कलाकारांनी आपल्या सिनेमासाठी टक्कल केले. आता याच अभिनेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेता शाहिद कपूरनेदेखील आपल्या आगामी 'हैदर' या सिनेमासाठी टक्कल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहिदने 'हैदर' या सिनेमासाठी टक्कल करणार असल्याचे जाहिर केल्यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले, की ''हैदरच्या शेवटच्या टप्प्यातील सीन्स ऐकून मी नर्व्हस आणि थोडा एक्साईटेड झालो आहे. गेल्या चार दिवसांपासून मी आपल्या केसांतून हात फिरवतोय.''
विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्यांनीच नव्हे तर अभिनेत्रींनीदेखील टक्कल करण्याचे धाडस दाखवले आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच काही कलाकारांविषयी सांगतोय, ज्यांनी भूमिकेसाठी टक्कल केले होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या कलाकारांविषयी..