आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pics : Alia Bhatt's Debut With Karan Johar's Film Student Of The Year

PICS : करणच्या सिनेमात महेश भट्टच्या मुलीचा जलवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माता-दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी आलिया भट्ट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. आलिया करण जोहरच्या आगामी 'स्टुडेंट ऑफ द ईयर' चित्रपटातून बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. आलियाबरोबर काम करणा-या वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्यांचाही हा पहिलाच सिनेमा आहे. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची कन्या असलेल्या आलियाने बालपणापासूनच अभिनेत्री व्हायचे स्वप्न पाहिले होते. मात्र वाढलेले वजन हे आलियासाठी डोकेदुखी ठरले होते.
लेखक निरंजन अईयंगर यांनी आलियाची भेट करणशी करुन दिली. तेव्हा करणच्या या चित्रपटासाठी ऑडीशन्स सुरु होत्या. करणने १०० शॉर्टलिस्ट मुलींमध्ये आलियाची निवड केली. ओव्हरवेट असूनदेखील आलियाने टॉप टेनमध्ये स्थान मिळवले.
आलियाविषयी करण सांगतो, 'आलियामध्ये एक चांगली अभिनेत्री होण्याचे सगळे गुण आहेत. वजन कमी केल्यास ही भूमिका तुला मिळू शकले असे म्हटले.' आलियाने जराही वेळ न दवडता वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आलियाने स्ट्रिक्ट डाएट आणि वर्कआऊट रुटीन फॉलो करुन तीन महिन्यात तब्बल १६ किलो वजन कमी केले आहे.