आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PICS: Dilfenk Boyfriend Left For Delhi With Ranbir Deepika Girlfriends

PHOTOS : आता ‘दिलवाली गर्लफ्रेंड’ चा तडका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या आगामी ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातील आणखी एक गाणे हल्ली प्रदर्शित झाले आहे. हे गाणेदेखील लोकांना वेड लावेल, असे या टीमचे म्हणणे आहे. याआधी ‘बलम पिचकारी’ गाणे रिलीज झाले होते.

‘तेरे लिए ही तो सिग्नल तोडताड के, आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोडछाड के’ असे नवीन गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात दीपिकाने लाल रंगाची घागरा ओढनी आणि रणबीरने राखाडी रंगाचा कुर्ता पायजामा घातला आहे. गाण्यात दोघांनी जोरदार नृत्य केले आहे. सिनेमातील दुसरे गाणे ‘बदतमीज दिल’ वर रणबीर कपूरने शम्मी कपूरसारखे नृत्य केले आहे. संगीतकार प्रीतमने या सिनेमाला संगीत दिले आहे. धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीनदेखील आहेत.
'दिल्लीवाली गर्लफ्रेंड...' या गाण्यात रणबीरने फनी डान्स स्टेप्स केल्या आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये बघा या गाण्याची खास झलक...