आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: 30 वर्षांची झाली साऊथची 'सदा', बघा तिचा ग्लॅमरस अंदाज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सदाने 17 फेब्रुवारीला आपला 30वा वाढदिवस साजरा केला. 17 फेब्रुवारी 1984 रोजी रत्नागिरीमध्ये जन्मलेल्या सदाचे खरे नाव सदफ मोहम्मद सैयद असे आहे. सदाचे वडील डॉक्टर तर आई बँक एक्झिक्युटिव्ह आहे. कोणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या सदाचा पहिलाच सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता.
2002मध्ये 'जायम' या तेलगु सिनेमाद्वारे सदा पहिल्यांदा मोठ्या प़डद्यावर झळकली होती. हा सिनेमा दिग्दर्शक तेजाने दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. त्यानंतर तिने 'अन्नियम' या तामिळ सिनेमात अभिनय केला. हा सिनेमा देखील हिट ठरला.
सदाने आत्तापर्यंत तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये काम केले आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने आजवर तीसहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. श्रीनिवास भाष्यम दिग्दर्शित 'लव खिचडी' या सिनेमाद्वारे सदाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. या सिनेमात रणदीप हुड्डा तिचा को-स्टार होता.
संगीत सीवनच्या 'क्लिक' या हॉरर सिनेमातही सदाने काम केले आहे.
सदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छायाचित्रांमध्ये पाहा तिचा ग्लॅमरस अंदाज...