आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pics: Priyanka Chopra & Ranveer Singh Romance In The New Song Of Gunday

PICS: 'गुंडे'चे 'जिया मेरा जिया' गाणे रिलीज, बघा प्रियंका आणि रणवीरचा हटके लुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा एक नाही दोन-दोन हीरोंसोबत रोमान्स करण्यासाठी तयार आहे. हो तुमची पीसी आता दोन-दोन हीरोंसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. लवकर तिचा 'गुंडे' सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामध्ये ती को-स्टार्स रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे.
अलिकडेच, प्रियंका म्हणाली होती, की ती कोणासोबतही रोमान्स करू शकते, कारण ते तिचे काम आहे. आता तर तिला एकसोबत दोन अभिनेत्यांसोबत रोमान्स करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
'गुंडे' सिनेमाचे दुसरे गाणे 'जिया मेरा जिया' रिलीज झाला आहे. या गाण्यामध्ये प्रियंका आणि रणवीर एका सुंदर ठिकाणी रोमान्स करताना दिसणार आहे.
प्रियंका या गाण्यात खूप आकर्षक दिसत आहे आणि रणवीर सिंह वाढलेल्या दाढी-मिशीमध्ये दिसत आहे. हे एक रोमाँटिक गाणे आहे, परंतु प्रियंका आणि रणवीर झाडांच्या अवती-भोवती फिरताना दिसत नाही. पर्वतावर एकमेकांसोबत रोमान्स करत आहे. सोबतच समुद्राचा एक सुंदर सीनसुध्दा आहे.
तसे या गाण्यात खूप काही नाहीये, परंतु प्रियंकाचा लुक खूप वेगळा आहे. बॉलिवूडच्या जून्या सिनेमांमध्ये अभिनेत्रींना गाण्यामध्ये वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दाखवल्या जात होते, तसेच प्रियंकासुध्दा या गाण्यात वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तिचा लुक बदलेला दिसतो.
रणवीर सिंहविषयी सांगायचे झाले, तर प्रियंकासोबतच्या त्याची ऑनस्क्रिन इंटीमेसीच्या तुलनेत दीपिकासोबत त्याचा रोमान्स खरा वाटत होता.
'गुंडे' हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे. याचे दिग्दर्शन अली अब्बासने केले आहे. सिनेमामध्ये 70-80च्या दशकातील सिनेमांची झलक बघायला मिळणार आहे. सिनेमा दोन कोल माफियाच्या जीवनावर आधारित आहे. हा एक अ‍ॅक्शन सिनेमा आहे आणि यावर्षी 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा प्रियंका आणि रणवीरचा गाण्यामधील रोमान्स...