आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'3 इडियट्स'पेक्षाही सुपरहिट होईल 'पीके'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मटरू की बिजली का मंडोला' च्या यशानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा आता राजकुमार हिरानीच्या 'पीके' साठी सज्ज झाली आहे. त्याचे शुटिंग फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सिनेमात आमिर खान, अनुष्का शर्मा आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहेत.
हिरानी आणि आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने अनुष्का उत्साहित आहे. ती म्हणाली की, ''आमिर खानसोबत काम करण्याचे मी स्वप्न पाहत होते. आता ते पूर्ण झाले आहे. आमिर आणि हिरानी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप खुश आहे. आमिरच्या '3 इडियट्स'पेक्षा हा 'पीके' चांगला ठरेल, अशी आशा करते. अलीकडेच आलेल्या माझ्या 'मटरू की बिजली का मंडोला' ला चांगले यश मिळाले आहे. यापेक्षाही घवघवीत यश 'पीके'ला मिळावे, अशी मी देवाजवळ प्रार्थना करत आहे.''
आपल्या सुंदरतेचे गुपित सांगतना अनुष्का म्हणाली की, घरी असताना मी कधीच मेकअप करत नाही फक्त सेटवरच मेकअप करते. शरीरासाठी पाणी उत्तम असल्याने भरपूर पाणी पिते, त्यामुळे मला घरी आणि सेटवर वॉटर बेबी म्हणून चिडवतातसुद्धा. तसेच मी नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करत असते. कोणत्याही गोष्टीचा कधीच ताण घेत नाही. मन दु:खी असेल तर ते चेहर्‍यावर नक्कीच दिसून येते. त्यामुळे मी नेहमी आनंदी राहते. तोच आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसतो.