आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Players Kumar Was Now King Khan Of Bollywood Mess

INSIDE SCOOP: सलमाननंतर आता अक्षय झाला शाहरुखचा नवा \'शत्रू\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि शाहरुख खान यांची दुश्मनी जगजाहिर आहे. आता सलमानबरोबरच शाहरुखचा एक नवा शत्रू निर्माण झाला आहे. आणि हा शत्रू दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आहे. आयपीएल मॅचच्या ओपनिंग सेरेमनीला अक्षय कुमारसुद्धा हजर होता. मिळालेल्या बातमीनुसार, अक्षय येथे त्याच्या आगामी 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई 2' या सिनेमाच्या प्रमोशनच्या उद्देशाने आला होता. मात्र किंग खानने त्याला आयपीएलमध्ये प्रमोशन करण्याची संधी दिली नाही. सेरेमनीमधून प्रमोशन न करता परतलेला अक्षय शाहरुखवर चिडला आहे.

या दोघांबरोबरही काम करणा-या बी टाऊनच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मते, या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध नव्हते. शिवाय ते दोघे एकमेकांचे शत्रूही नव्हते. शाहरुख आणि अक्षयने 'दिल तो पागल है' या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर हे दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले नाहीत.

फिल्मी पार्टीज आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये अनेकदा हे दोघे समोरा-समोर आले. मात्र कधीही हे दोघे एकमेकांशी भेटताना किंवा बोलताना दिसले नाहीत. बातमी अशीही आहे की, शाहरुख खानने काही सिनेमांमध्ये अक्षयला बाहेरचा रस्ता दाखवला आणि दोन सिनेमांमध्ये त्याला रिप्लेसही केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी...