आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Say No Evidence Of Murder, Mother To Move High Court

अमेरिकेची `एफबीआय` करणार जिया खानच्या मृत्यूचा तपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री जिया खान मृत्यूच्या चौकशी प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. जियाच्या मृत्यूच्या चौकशी प्रकरणी मुंबई पोलिसांना आता अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एफबीआय (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) मदत करणार आहे.
जियाची आई राबिया खान ब्रिटीश नागरिक तर जन्मामुळे जिया ही अमेरिकन नागरिक होती. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यासाठी तिची आई रबिया खान यांनी अमेरिकेच्या दुतावासाकडे चौकशीमध्ये हस्तक्षेपाची मागणी केली होती. रबिया यांच्या पत्रावर विचार करून अमेरिकेच्या दुतावासाने सीबीआयला हे पत्र पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे. आता याप्रकरणी 27 जानेवारीला एफबीआय आणि जियाची आई राबिया खान यांच्या एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
यापूर्वी राबिया खान यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत राबिया खान यांनी जियाची हत्या झाल्याचा दावा केला आहे. जियाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, जियानं गळफास लावून आत्महत्या केली असती तर तीची जीभ आणि डोळे बाहेर आले असते. परंतु, जियाचा मृतदेह पाहून अशा कोणत्याही गोष्टी दिसून आल्या नाहीत. यासोबतच जियाच्या वकिलांनी आणखीही काही कारणं दिली आहेत, ज्यामुळे जियाचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला जातोय.

पुढे वाचा, सूरज पांचोलीवर आरोपपत्र दाखल...