आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Station Set Up Only For Dhadhak Girl Madhuri Dixit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात ‘धकधक गर्ल ’ माधुरीच्या भेटीसाठी रातोरात उभारली पोलिस चौकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - बॉलीवूडच्या स्टारची जादू सर्वांवर सारखीच असते, पण त्यात जर ‘धकधक गर्ल ’ माधुरी दीक्षित असेल तर बात काही औरच. बाप स्थानकावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरणाच्या काळात माधुरीला भेटण्याचा योग जुळवून आणण्यासाठी बाप स्थानकावर रेल्वे पोलिस दलाची चौकी रात्रीतून बांधण्यात आली. हा सगळा खटाटोप रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक व अधिका-यांनी केला. एका छोट्या चौकीच्या उद्घाटनासाठी महासंचालक आल्याने दिवसभर लगीनघाई सुरू होती.


महासंचालकांच्या हस्ते फीत कापून चौकीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचा हा उपचार केवळ दहा मिनिटांत आटोपला. त्यानंतरच खरा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला महासंचालकांसमोर जवळपास परेडच करावी लागली. युनिटमधील कलाकारदेखील जीएम साहेबांसमोर आज्ञाधारकपणा दाखवत होते. कारण, त्यांना सर्व नियम धाब्यावर ठेवून सोयी-सवलती पुरवण्यात आलेल्या होत्या. शूटिंगसाठी त्यांच्याकडून केवळ स्थानक व रेल्वेचे शुल्क घेण्यात आले. वास्तविक संपूर्ण स्थानकाचा वापर करण्यात आला. एवढेच नाही तर चित्रीकरणासाठी स्थानकाला काळा-पिवळा रंगही देण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी तयार झालेल्या पोलिस चौकीच्या उद्घाटनासाठीदेखील हा मुहूर्त शोधण्यात आला. तसे आदेश जारी झाले. जीएमचे आगमन होण्याच्या पूर्वसंध्येला उशिरा रात्री चौकीच्या भिंतींना टाइल्स बसवण्यात आली. दरवाजे बसवण्यात आले. एसी लावण्यात आले.