आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत सर्वांनी वाहिली सुचित्रा यांना श्रध्दांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मनमोहनसिंग आणि इतर अनेक नेत्यांनी अभिनेत्री सुचित्रा सेन यांना श्रध्दांजली वाहिली आणि दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान शोकसंदेशमध्ये म्हणाले, की 'सेन यांनी देशातील लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केले. सिनेमाच्या क्षेत्रात मौल्यवान योगदान दिले.'
मनमोहनसिंग असेही म्हणाले की, 'सुचित्रा त्या कलाकारांमधील एक कलाकार आहे ज्यांनी 1963मध्ये मॉस्कोमध्ये आंतराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. त्यांच्या अभिनयात कौशल्य होते. त्यांनी तीन दशके स्वत:ला एकाच व्यक्तिमत्वात प्रदर्शित केले.'
केंद्रीय मंत्री मनीष तिवारी शोक व्यक्त करताना म्हणाले, 'सुचित्रा सेन यांनी त्यांच्यामागे अनेक आठवणी सोडल्या आहेत. भारतीय सिनेमाचा आणखी एक रत्न आपल्याला सोडून गेला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.'
भाजपाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीसुध्दा सुचित्रा सेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी टि्वट केले, 'सुचित्रा सेन यांच्या आत्म्याला शांती मिळो. आपण एक अशा अभिनेत्रीला गमावले आहे ज्यांनी हिंदी आणि बंगाली दोन्ही सिनेमांमध्ये अविस्मरणीय योगदान दिले आहे.'
भाजप नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या, 'सुचित्राजी एक आदर्श महिला आणि उत्कृष्ट कलाकार होत्या.'
मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, 'सुचित्रा सेन यांचे हिंदी आणि बंगाली सिनेमातील योगदान नेहमीच लक्षात राहिल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा बॉलिवूड स्टार्सने दिली सुचित्रा सेन यांनी श्रध्दांजली.