आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांसह किसींग फोटोशूट करुन खळबळ उडवणारी पूजा भट्ट आता दिसते अशी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
90च्या दशकाताली अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांच्या अभिनयाला प्रेक्षक आजही दाद देतात. यापैकी काही अभिनेत्री आजही फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत, तर काहींनी येथून संन्यास घेतला आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट. नव्वदच्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अभिनेत्रींमध्ये पूजा भट्टची गणना होते. मात्र काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकल्यानंतर पूजाने सिल्व्हर स्क्रिनला रामराम ठोकला आणि कमबॅक करण्याचा पुन्हा प्रयत्नसुद्धा केला नाही.
इंडस्ट्रीतील प्रसिद्ध भट्ट कुटुंबात जन्मलेली पूजा निर्माते दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. महेश पट्ट यांच्या पहिल्या पत्नी एंग्लो-इंडियन आहेत. लॉरेन ब्राइट या नावाने त्या प्रसिद्ध आहेत. आता पूजा तिचे वडील महेश, सावत्र आई सोनी राजदान आणि सावत्र बहीण आलियासह राहते. अलीकडेच ती आलिया भट्टच्या 'हायवे' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी दिसली होती.
पूजा भट्टचा जन्म 24 फेब्रुवारी 1972 रोजी झाला होता. आज ती आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहे. आता पूजा पडद्यावर नव्हे तर पडद्यामागे काम करते. अभिनयाला रामराम ठोकल्यानंतर ती दिग्दर्शिका म्हणून नावारुपास आली आहे. मात्र अभिनयाच्या काळात ती खूप सुंदर दिसत होती आणि तिची फिगरसुद्धा मेंटेन होती. अलीकडेच हायवेच्या स्क्रिनिंगला मीडियासमोर आलेली पूजा आता बरीच लठ्ठ झाली आहे.
पूजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यासंदर्भातील काही खास गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या तिच्याविषयी बरंच काही...