आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pooja Bhatt To Play Lead Role In Hazarika's Bipoic

हजारिका यांच्या बायोपिकमध्ये कल्पना लाजमी यांची भूमिका साकारणार पूजा भट्ट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रुद्राली'सारख्या महिला प्रधान सिनेमाच्या उत्कृष्ट फिल्मकार कल्पना लाजमी त्यांचा जीनवसाथी आणि दिग्गज गायक-संगीतकार भूपेन हजारिका यांच्यावर एक सिनेमा बनवणार आहे.
हजारिका यांचे 2011मध्ये निधन झाले. हजारिका यांच्या भूमिका साकारण्यासाठी अद्याप अभिनेता ठरलेला नाही. परंतु लाजमी यांच्या भूमिकेसाठी पूजा भट्टला निवडले आहे. पूजा या सिनेमामध्ये तिचे काही पैसे गुंतवणार आहे. सिनेमाच्या क्रिएटीव्ह प्रकियेचे सर्व जबाबदारी महेश भट्ट यांच्याकडे असणार आहे.
या बायोपिक सिनेमाची पटकथा कल्पना लाजमी लिहिणार आहेत आणि यासाठी त्या सह-लेखकाच्या शोधात आहेत. या सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्या सिनेमामध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी इतर निर्मात्यांना संपर्क साधणार आहेत. त्यांनी सिनेमाच्या पात्रांविषयी बोलण्यास नकार दिला आहे. लाजमी यांच्या सांगण्यानुसार, की एकदा सिनेमाची पटकथा तयार झाली, की पैशांचीही व्यवस्था होईल.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, लाजमी यांची भूमिका पूजा भट्ट करणार आहे.