आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भट्ट कँपची आता पूनम पांडेवर नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नशा’ या सिनेमामुळे वादग्रस्त ठरलेली अभिनेत्री पूनम पांडेवर आता अनेक दिग्दर्शक नजरा ठेवून आहेत. 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार्‍या या सिनेमाद्वारे पूनमच्या करिअरला नवी दिशा मिळू शकते. आता भट्ट कँपची नजरही तिच्यावर पडली आहे. मुकेश भट्ट आपल्या आगामी सिनेमात पूनमला प्रमुख भूमिका देण्याच्या विचारात आहेत. मात्र, सर्वकाही ‘नशा’ सिनेमातील तिच्या सादरीकरणावर अवलंबून असेल. ‘नशा’चे दिग्दर्शक अमित सक्सेना यांच्या कामावर मुकेश भट्ट प्रभावित झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पूनम पांडेच्या करिअरसाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा ठरू शकतो. अमित यांनी 2013 मधील भट्ट कँपचा ‘जिस्म’ दिग्दर्शित केला आहे.