आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poonam Pandey’S Nasha To Compete With 8 Other Films

या शुक्रवारी तब्बल 8 सिनेमांबरोबर होणार पूनम पांडेच्या बोल्ड 'नशा'ची टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जुलै महिन्यातील 26 तारखेची नोंद बॉलिवूडच्या इतिहासात होणार आहे. कारण या दिवशी बॉक्स ऑफिसवर सिनेमांचा महापूर येणार आहे. या दिवशी तब्ब्ल नऊ हिंदी सिनेमांची भाऊगर्दी बॉक्स ऑफिसवर होणार आहे.

26 जुलै रोजी वादग्रस्त मॉडेलहून अभिनेत्री झालेली पूनम पांडे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेत आहे. तिचा 'नशा' हा पहिला सिनेमा शुक्रवारी रिलीज होतोय. मात्र तिच्या या सिनेमाला तब्बल आठ हिंदी सिनेमांशी टक्कर होणार आहे. कारण या दिवशी नशाबरोबर आणखी आठ हिंदी सिनेमे रिलीज होतायेत. यामध्ये 'बुद्धा', 'आय लव्ह न्यू इयर', 'इसाक़', 'उप्स अ देसी', 'बजाते रहो', 'लव्ह यु सोनियो', 'एक बुरा आदमी', 'प्राग' या सिनेमांचा समावेश आहे.

यातले बहुतांश सिनेमे हे छोट्या बजेटचे आहेत. तसे पाहता पुनमच्या नशा सिनेमाचे प्रमोशन खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. त्याच्या पब्लिसिटीचा फायदा सिनेमाला होईल असे म्हटले जात आहे.
पूनमच्या न्यूड अँक्टपासून ते सिनेमाचे पोस्टर्स आधीच गाजत आहे. त्यामुळे पूनमचे चाहते तिचा हा सिनेमा बघण्यासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे.

आता या सिनेमांच्या भाऊगर्दीत पूनमची 'नशा' सिनेरसिकांवर चढणार का ? हे पाहुयात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा पूनमच्या 'नशा'ची झलक...