आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जल'द्वारे पुनरागमन करणार पूरब कोहली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रॉक ऑन'चे यश पूरब अद्याप विसरलेला नाही. मंदी असल्याने 2009-10 मध्ये त्याचे चार सिनेमे मध्येच बंद पडले. या सिनेमांमध्ये त्याच्या चांगल्या भूमिका होत्या. मात्र, आता तो 'जल' सिनेमाच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. हा सिनेमा 28 मार्च रोजी प्रदर्शित होईल. दिग्दर्शक गिरीश मलिकच्या या सिनेमात बक्का नावाच्या एका गुजराती व्यक्तीची भूमिका तो साकारत आहे. या भूमिकेतून तो वाळवंटात पाणी शोधण्याची आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करतो. सिनेमात पूरबबरोबर तनिष्ठा चॅटर्जीचीदेखील प्रमुख भूमिका आहे. आपल्या भूमिकेची तयारी करण्यासाठी त्याने दिग्दर्शक गिरीशसोबत कच्छच्या वाळवंटात काही दिवस मुक्काम केला.
परब सांगतो, 'ही भूमिका करताना सुरुवातीला मी गोंधळलो होतो. कारण लोकांच्या मनात माझ्याबद्दलची प्रतिमा शहरी आहे आणि ही भूमिका अस्सल ग्रामीण आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी सप्टेंबर आणि नंतर ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता. यादरम्यान प्रतिष्ठित बुसान आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात हा सिनेमा निवडण्यात आला आणि तिथे या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला.