आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Post Separation With Suzanne, Hrithik Roshan Is Leaving His Father's House

सुझानच्या घटस्फोनंतर ऋतिक सोडणार वडीलांचे घर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुझानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ऋतिक रोशनसाठी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यामध्ये ताजी बातमी आहे, की ऋतिक त्याच्या राहत्या घराला सोडून आता जुहूमध्ये समुद्राच्या समोर असलेल्या एका नवीन अपार्टमेंटमध्ये राहणार आहे. या अपार्टमेंटचे काम चालू झाले आहे आणि एका महिन्यात पूर्ण होणार आहे. ही बातमी त्या सर्व लोकांसाठी आश्चर्याची आहे जे ऋतिकला जवळून ओळखतात.
पत्नीपासून दुर झाल्यानंतर प्रत्येकाला वाटले होते, की या वाईट क्षणात कुटुंबच त्याचे सात्वन करेल. सर्वांनाच माहीत आहे. रोशन कुटुंब एकमेकांच्या किती जवळ आहे. एका सुत्राने सांगितले, की 'ऋतिक आजपर्यत त्याच्या आई-वडीलांना सोडून कधीच एकटा राहिलेला नाही. ही पहिली वेळ आहे की ऋतिक त्याच्या आई-वडीलांना सोडून एकटा राहणार आहे.' त्याच्या या निर्णयामागे अनेक तर्क लावले जात आहेत.
काहींच्या सांगण्यानुसार, 'ऋतिकच्या जून्या अपार्टमेंट सुझान तिच्या मुलांसह राहण्यास येणार आहे.' एका अंतर्गत सुत्राच्या सांगण्यानुसार, 'परंतु यामागे काही तर्क दिसून येत नाहीये. ते दोघेही पहिल्यापासूनच वेगळे राहत आहे. त्याचबरोबर ऋतिकचे हे अपार्टमेंट त्याच्या आई-वडीलांच्या घराजवळच आहे. ते दोघेही वेगळे झाल्यानंतर त्या कुटुंबात एकत्र का राहतील?'
बॉलिवूडमध्ये ही गोष्ट काही नवीन नाही. जेव्हा बोनी कपूरने त्याची पत्नी मोना कपूरला श्रीदेवीसाठी सोडले होते, तेव्हा त्यानेही घर सोडले होते. आणि मोना त्याच्या आई-वडीलांजवळ राहत होती. या सर्व घटनेत दुसरे कारण असे की, ऋतिक आणि त्याच्या वडीलांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. सुत्रांनी सांगितले, की 'मागे काही दिवसांपूर्वी 'क्रिश 3' सिनेमाच्या काही गोष्टींवरून त्यांच्यात किंचीत तणाव निर्माण झाला होता. ऋतिक खूप शांत आहे.'