आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोपाळमध्ये 'जिस्म-२' चित्रपटाला तीव्र विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - देशभरात आज (शुक्रवार) रिलीज झालेल्या 'जिस्म-२' या चित्रपटाला भोपाळमध्ये तीव्र विरोध करण्यात आला. कट्टरपंथी संघटनांनी चित्रपटाचे पोस्टर फाडून जाळून टाकले. बजरंग दल आणि त्यांच्या सहयोगी कार्यकर्त्यांनी येथील ज्योती टॉकीजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील एक मोठ पोस्टर फाडून टाकले. त्यानंतर त्या पोस्टरला जाळून टाकण्यात आले. टॉकीजच्या सुरक्षारक्षकांनी मुख्य दार मधून बंद केल्यामुळे प्रदर्शनकारी आत जाऊ शकले नाही.
प्रदर्शन करणाऱ्या लोकांचे म्हणणे होते की, या चित्रपटाच्या माध्यमातून तरुणांमध्ये अश्लीलता वाढवण्याचे काम केले जात आहे. चित्रपटाचे पोस्टर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यांनी असेही सांगितले की, हे तर फक्त सांकेतिक प्रदर्शन आहे. चित्रपट जर अल्पवयीन मुलांना दाखवण्यात आला तर, यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल. शहर पोलीस अधीक्षक समर वर्मा यांनी सांगितले की, सध्या या घटनेच्या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस या घटनेवर लक्ष ठेवून आहे.