आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभुदेवा सुरू करणार नृत्यशाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड आणि टॉलिवूडचा मायकेल जॅक्सन म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता प्रभुदेवाने आता स्वत:ची नृत्यशाळा सुरू करण्याची तयारी चालवली आहे. अर्थात डान्स स्कूल सुरू करणे आपले स्वप्न असले तरी ते साकार करणे आपल्यासाठी सोपे नाही, असे त्याला वाटते. ‘मुकाबला’, ‘उर्वशी उर्वशी’, ‘के सरा सरा’, ‘गो, गो, गोविंदा’ यासारख्या गाण्यांमधून प्रभुदेवाने त्याचे चाहते निर्माण केले. त्याने एका कार्यक्रमात सांगितले की, डान्स स्कूल सुरू करण्याची आपली इच्छा आहे, परंतु त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. हा प्रकल्प आपल्या मनाच्या अगदी जवळ आहे. प्रभुदेवा त्याची नृत्यशाळा मुंबईत किंवा चेन्नईत सुरू करू शकतो. ‘एबीसीडी’ या सिनेमातून चाहत्यांना त्याच्या नृत्याची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.