आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राची शिकली बॉलीवूडचा फंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्राची देसाईला बॉलिवूडमध्ये येऊन जास्त वेळ झाला नाही. मात्र येथे टिकून राहायचे असेल तर चांगले काम करावे लागेल हे तिला चांगले माहीत आहे. हा मंत्र जपतच प्राची आपले काम गांभीर्याने करते. म्हणूनच ती आपल्या आगामी सिनेमासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. ‘आय, मी और मैं’ या सिनेमात ती एका हेअर स्टायलिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्राची हेअर स्टायलिस्ट अधुना अख्तरची मदत घेत आहे. प्राची रोज चार-पाच तास अधुनाच्या सलूनमध्ये घालवते. प्राचीचे हे सर्मपण पाहून अधुनाने तिला स्टायलिंग, कटिंग आणि ग्रूमिंगच्या बेसिक टिप्स शिकवल्या आहेत. व्वा प्राची, व्हेरी गुड.