आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चेन्नई एक्स्प्रेस'ने रोखला 'सत्याग्रह'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सत्याग्रह’ सिनेमाचे प्रदर्शन एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हे याचे कारण आहे. आधी हा सिनेमा 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. चित्रपट समीक्षकांच्या मते, 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार्‍या या सिनेमाचा लागोपाठ तीन आठवड्यांपर्यंत सिंगल स्क्रीन थिएटर्सवर एकाधिकार राहील. दोन्हीही सिनेमांचे निर्माते असलेल्या डिझ्नी स्टुडिओने या सिनेमातील बड्या कलावंतांचा विचार करून विशेष धोरण आखले आहे. याअंतर्गत सिनेमाच्या प्रोमोशन आणि प्रदर्शनामध्ये अंतर ठेवले जाईल.

शाहरुख खानसाठी पूर्ण तीन आठवडे सोडत आता प्रकाश झा दिग्दर्शित, अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करीना कपूर अभिनीत ‘सत्याग्रह’ 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचप्रसंगीही प्रकाश झा यांना प्रश्न विचारला असता हा सिनेमा ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे ते म्हणाले. यापूर्वीदेखील शाहरुखच्या सिनेमामुळे ‘वन्स अपॉन अ टाइन इन मुंबई दुबारा’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.