आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या विशेष राज्याच्या दर्जावर आता बनणार सिनेमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी पाच तास आंदोलन केले. याच विषयावर सिनेमाची निर्मिती करण्याच्या विचारात प्रकाश झा आहेत. मात्र, हा विषय सिनेमाच्या माध्यमातून कसा मांडला जाणार, याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही.
प्रकाश झा यांनी सोमवारी सांगितले की, 'या थीमवर एक डॉक्युमेंट्री बनू शकते किंवा या विषयाला अन्य सिनेमांच्या कथेमध्ये सामाविष्ट केले जाऊ शकते.' प्रकाश झा यांनी मागील काही सिनेमांत राजकीय विषय हाताळल्याने ते या सिनेमाची निर्मिती करण्याची जास्त शक्यता आहे. त्यांचा 'सत्याग्रह' हा सिनेमा अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावर आधारित होता.
यापूर्वी त्यांनी 'चक्रव्यूह' आणि 'राजनीती' हे सिनेमे बनवले होते. मागील लोकसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची उमेदवारी मिळालेले प्रकाश झा राजकीय विषयांवर सातत्याने सिनेमांची निर्मिती करत आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या विषयावर ते रविवारी पाटण्याच्या गांधी मैदानावरही बोलले होते.