आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश राज बनले शेतकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नकारात्मक भूमिकांमुळे मोठ्या पडद्यावर छाप सोडणारा प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता सध्या एकाचवेळी अनेक सिनेमांवर काम करत आहे. मात्र, हिंदीव्यतिरिक्त तामिळ, तेलुगू आणि कानडी सिनेमांचे चित्रीकरण डबिंगमध्ये व्यग्र असतानाही ते स्वत:साठीसुद्धा वेळ काढत आहेत.

प्रकाश राज यांनी नुकतीच महाबलीपूरम (तामिळनाडू) आणि हैदराबादजवळ फार्म हाउस आणि ट्रॅक्टरची खरेदी केली आहे. फेसबुकवर त्यांनी लिहिले आहे की, ‘स्वत:ची शेती आणि ट्रॅक्टर असावे, ही माझी लहानपणापासूनची इच्छा होती. ही इच्छा मी आज पूर्ण केली आहे.’ त्यांच्या जवळच्या मित्रांनुसार, प्रकाश यांना वेळ काढून फार्म हाउसजवळ असलेल्या शेतात ट्रॅक्टर चालवायला आवडते.