आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे निधन, आज दुपारी शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिकेत जान ओतणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण ऊर्फ प्राण कृष्ण सिकंद यांचे (93) लीलावती रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. संगीताच्या सुवर्णयुगात सुरुवातीला नायक व नंतर आपल्या खलनायकी अभिनयाने नवा दरारा निर्माण करणारा अभिनेता म्हणून प्राण यांची ओळख होती. केवळ खलनायकच नव्हे तर विविध चरित्र व्यक्तिरेखा त्यांनी पडद्यावर सकस अभिनयाने सादर केल्या.

प्राण यांनी 350 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. खानदान, हलाकू, मधुमती, जिस देश में गंगा बहती है, उपकार, शहीद, आँसू बने अंगारे, जॉनी मेरा नाम, व्हिक्टोरिया नं.203, बेइमान, जंजीर, डॉन आणि दुनिया चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. कला क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना 10 मे 2013 रोजी गौरवण्यात आले.