आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनला लक्झरी कार, प्रियांकाला महागड्या गिटार, अशा भेटवस्तू देऊन शाहरुख झाला दिलदार मित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दिवसांपूर्वी मिका सिंहने त्याच्या गळ्यातील लॉकेट काढून सन्मान स्परुपात रेखा यांना भेट दिले होते. बॉलिवूडमध्ये भेट देण्याची ही परंपरा आपल्या जवळच्या व्यक्तींचे मन जिंकण्यासाठी सर्वात सोपी आहे.
शाहरुख खानने मोबाईल आणि लॅपटॉपपासून ते बाईकपर्यंत दिल्या भेटवस्तू
किंग खानने 'चेन्नई एक्स्प्रेस'चा दिग्दर्शक रोहित शेट्टीला 15 लाखांची महागडी गाडी भेट म्हणून दिली होती. एवढेच नाही तर, त्यानेच उडणा-या गाड्यांच्या आकारातील त्याचा बर्थडे केकसुध्दा ऑर्डर केला होता. 'जब तक है जान'च्या शुटिंगच्या दरम्यान कतरिना कैफला लंडनमध्ये एक जॉकेट आणि जिम बॅगसुध्दा शाहरुखने भेट दिली होती.
'ओम शांती ओम'च्या एका गाण्यात जवळपास सर्व बॉलिवूड स्टार्स दिसले होते, कुणीच त्या गाण्यासाठी पैसे घेतले नव्हते. परंतु शाहरुखने नंतर त्यांना सर्वांना महागडे मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडसारख्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्याच्याकडून दिग्दर्शक फराह खानला लग्झरी गाडी भेट म्हणून मिळाली होती. 'रा.वन' आणि इतर सिनेमांसाठी काम करणा-या पाहूण्या कलाकरांना त्याने अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
प्रियांका चोप्राला किंमती गिटार, अर्जून रामपाल आणि रजनीकांत यांना लक्झरी गाडी भेट दिली होती. सलमानचा खास मित्र संजय दत्तला शाहरुखने सुपर बाईक भेट म्हणून दिलेली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा भेट देण्यात सलमान, रणबीर आणि दीपिकादेखील नाहीत मागे...