आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दबंग’,‘राउडी राठौर’सारखा नाही ‘औरंगजेब’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण भारतीय सिनेमाचा अभिनेता पृथ्वीराज म्हणतो की, त्याचा ‘औरंगजेब’ सिनेमा बॉलिवूडच्या पोलिस नायक प्रधान सिनेमापेक्षा वेगळा आहे. पृथ्वीराज या सिनेमात एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा 17 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

पृथ्वीराज (30) ने एका मुलाखतीत सांगितले की, ‘औरंगजेब एक वास्तविक घटनेवरील सिनेमा आहे. सिनेमातील भूमिका खरी वाटावी म्हणून खूप मेहनत घेतली आहे. हा सिनेमा बॉलिवूडच्या व्यावसायिक ‘दबंग’ किंवा ‘राउडी राठौर’ सारखा नाही. सिनेमात पोलिसाची भूमिका करणे माझ्यासाठी नवीन नव्हते. या आधी मी 15-20 सिनेमांत पोलिसाची भूमिका केलेली आहे. उत्तर भारतीय पोलिसाची भूमिका करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मात्र मी छाप सोडण्यात यशस्वी ठरेन.’

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अतुल सबरवालने केले आहे. सिनेमात अर्जुन कपूर दुहेरी भूमिकेत आहे. ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, अमृता सिंह, स्वरा भास्कर आणि साशा आगादेखील मुख्य भूमिकेत आहेत.