आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनिष्कच्या अ‍ॅडमध्ये झळकणा-या या अभिनेत्रीने टॉपलेस होऊन माजवली होती खळबळ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या तनिष्क ज्वेलरीची एक जाहिरात बरीच चर्चेत आहे. या जाहिरातीतून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. ही जाहिरात समाजाला नवीन दिशा देणारी ठरली आहे. या जाहिरातीत विधवा पुनर्विवाहाला प्राधान्य देण्याचे पाऊल उचलले गेले आहे.

या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे, एक स्त्री दुस-यांदा बोहल्यावर चढली आहे. ती नटून-थटून मंडपात आपल्या होणा-या पतीबरोबर सप्तपदी घेताना दिसते. त्यावेळी तिची सहा वर्षांची मुलगी तिच्याबरोबर फेरे घेण्यास इच्छूक असते. मात्र तिची आई यासाठी तिला नकार देते. नवरदेव मात्र त्या चिमुकल्या मुलीच्या इच्छेचा मान ठेवत तिला आपल्या कडेवर घेऊन फेरे पूर्ण करतो. ही जाहिरात नक्कीच ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी करण्यात आली असली तरीदेखील ही एक प्रेरणासुद्धा आहे.

या जाहिरातीत ज्या अभिनेत्रीने अभिनय केला आहे, ती एक बंगाली अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रियांका बोस.

प्रियांकाच्या अभिनयाचे कौतुक होण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तनिष्कच्या जाहिरातीत झळकलेल्या प्रियांकाने 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'गंगोर' या बंगाली सिनेमात बरेच बोल्ड सीन्स दिले होते.

हा सिनेमा बलात्कारपीडित एका आदिवासी महिलेवर आधारित होता. एकीकेड पोलिस आणि प्रशासन तिच्यासोबत घडलेल्या या भयावह घटनेला दाबण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या महिलेचा आत्मविश्वास आणि संघर्ष बघून तिचा समाजसुद्धा तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमात प्रियांकाने आदिवासी महिला गंगोरची भूमिका साकारली होती.

या सिनेमात बोल्ड सीन्स चित्रीत करताना कलात्मकतेकडे विशेष लक्ष देण्यात आले होते.

एक नजर टाकुया प्रियांकाने दिलेल्या बोल्ड सीन्सवर...