आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra’S Sensuous Moves In ‘Babli Badmaash’

VIDEO: पाहा \'बबली बदमाश\' बनलेल्या प्रियांकाचा नवीन लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ब-याच दिवसांपासून प्रियांका चोप्राच्या आयटम नंबरची बरीच चर्चा रंगत आहे. आगामी 'शुटआउट अ‍ॅट वडाला' या सिनेमात प्रियांकाचा धमाकेदार आयटम नंबर असणार आहे. या आयटम साँगमधून प्रियांका 'बबली बदमाश' म्हणून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच हा आयटम नंबर यु-ट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. एकाच दिवशी पंधरा हजारांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडिओ यु-ट्यूबवर बघितला गेला आहे.

या गाण्यात प्रियांकाने खास एलईडी लाइट्स असलेला ड्रेस घातला आहे. बिग बींच्या ‘याराना’ सिनेमातील बल्ब आउटफिटशी याचे साम्य आहे. प्रियांका या ब्लॅक आउटफिटमध्ये जास्तच खुलून दिसत आहे. या गाण्यात आपल्याला प्रियांकाचा हा रेट्रो अवतार ऐंशीच्या दशकाची आठवण करून देणारा आहे.

प्रियांकाचे हे पहिले आयटम साँग सुनिधी चौहानने गायले असून अनू मलिकने त्याला संगीत दिले आहे.

व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'बबली बदमाश'ची होश उडवणारी अदा...