आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या वडिलांची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी केले मोबाईल बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांची प्रकृती गंभीर असून ते कॅन्सरशी लढा देत आहेत. मीडियात त्यांच्या आजारपणाची बातमी आल्यानंतर प्रियांका आणि तिच्या कुटुंबीयांना मित्र आणि शुभचिंतकांचे सतत फोन येत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारंवार फोन कॉल्स येत असल्यामुळे प्रियांका आणि तिचे कुटुंबीय त्रासले आहेत. त्यामुळे त्यांनी फोन उचलणेच बंद केले आहे. प्रियांका आणि तिचे कुटुंबीय फक्त महत्त्वाच्या व्यक्तींचेच फोन रिसीव्ह करत आहेत.