आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FICCI FRAMESमध्ये प्रियांकासह पोहोचले अनेक स्टार्स, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा 14 मार्चला मुंबईमध्ये 15व्या फिक्की फ्रेम्स या कार्यक्रमाच्या शेटवट्या दिवशी पोहोचली होती. कार्यक्रमात पोहोचल्यानंतर तिने बॉलिवूड संबंधीत अनेक गोष्टी शेअर केल्या.
फिक्की फ्रेम्स कार्यक्रमात प्रियांका व्हिक्टोरिआ बेहकम शर्ट, काळ्या रंगाचे जॅकेट आणि गबाना पँटमध्ये खूपच आकर्षक दिसत होती. कार्यक्रमात तिच्याव्यतिरिक्त अभिनेता अनुपम खेर, अभिनेत्री शबाना आझमी, दिग्दर्शक सुभाष घई आणि मधुर भंडारकरसुध्दा उपस्थित होते. या सर्व स्टार्सनी कार्यक्रमात त्यांचे अनुभव शेअर केले.
पाहूणी म्हणून कार्यक्रमात पोहोचलेल्या प्रियांकाने अभिनेत्रींना सिनेमात मिळणा-या मानधनाविषयीसुध्दा सांगितले. ती म्हणाली, की आजही सिनेमात अभिनेता आणि अभिनेत्री यांना मिळणा-या मानधनात खूप अंतर आहे आणि हे अंतर लवकरात-लवकर नक्कीच संपेल. तीन दिवस चालेला हा कार्यक्रम बुधवारी सुरू झाला होता. या कार्यक्रमात एंटरटेनमेन्ट आणि माध्यमांच्या विकासावरसुध्दा चर्चा झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा FICCI कार्यक्रमाची काही खास छायाचित्रे...