आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Came To Release The Audio Of Her Film Deewana Main Deewana

PHOTOS : प्रियांकाने केले 'दीवाना मैं दीवाना'चे ऑडियो रिलीज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोप्रा आणि गोविंदा या जोडीच्या 'दीवाना मैं दीवाना' या सिनेमाचे ऑडियो रिलीज नुकतेच पार पडले. प्रियांकाच्या हस्ते हे ऑडियो रिलीज करण्यात आले. हा सिनेमा रिलीज व्हायला तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला आहे. एवढ्या वर्षांनी आता येत्या 1 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.

फिल्ममेकर के. सी. बोकाडि़याने हा सिनेमा खूप दिवसापूर्वी तयार केला होता. मात्र सिनेमासाठी वितरक मिळत नसल्यामुळे हा सिनेमा रखडला होता. अखेर या सिनेमाला रिलीजचा मुहूर्त गवसला आहे.

या सिनेमाच्या ऑडियो रिलीज कार्यक्रमाला प्रियांकासह शेखर सुमन, आदित्य पंचोली, नसीर खान, इला अरुण, सुदेश भोसले, उदित नारायण, महेंद्र धारीवाल आणि टीपी अग्रवाल हजर होते. गोविंदा मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या कार्यक्रमाची छायाचित्रे...