आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशीबाईच्या भूमिकेत दिसणार प्रियांका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्सालींचा बहुप्रतीक्षित 'बाजीराव मस्तानी' गेल्या एक दशकापेक्षाही जास्त काळापासून चर्चेत आहे. सिनेमात प्रत्येक वेळी प्रमुख कलावंत घेतले जातात, पण नंतर चर्चा मात्र पुढे सरकत नाही.
सलमान खान, शाहरुख खान, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अजय देवगण, हृतिक रोशन आणि अशा किती कलावंतांचा या यादीत समावेश असेल याची कल्पना अद्याप तरी करणे शक्य नाही. बाजीराव आणि मस्तानीच्या मुख्य भूमिकांसाठी अजूनदेखील कुणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मराठा राजा बाजीरावच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र, याबाबत संजय किंवा प्रियांकाकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.