आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Goes Asalaam E Ishqum With Mithun Chakraborty On Dance India Dance

\'डान्स इंडिया डान्स\'च्या सेटवर पोहोचले \'गुंडे\', बघा प्रियांकाची मस्ती आणि डान्स स्टेप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही रिअ‍ॅलिटी 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोच्या सेटवर धूम घातल्यानंतर 'गुंडे' सिनेमाचे स्टारकास्ट 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवर धमाल करण्यासाठी आले होते. 'गुंडे'चे तिन्ही स्टार्स अर्जुन कपूर, रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांनी या शोच्या स्टेजवर डान्स करून एन्जॉय केला. तसे पाहता, या स्टार्सने 'इंडीयाज गॉट टॅलेंट'च्या सेटवरसुध्दा बरीच धमाल-मस्ती केली होती आणि जवळपास शोच्या सर्वच परिक्षकांसोबत डान्स केला होता.
2013मध्ये सिनेमे आणि अल्बमच्या यशानंतर प्रियांकाचा आत्मविश्वास आता वाढलेला दिसत आहे. 2014मध्येसुध्दा ती मागच्या वर्षीसारखे यश मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. 'गुंडे' या वर्षीचा तिचा पहिला सिनेमा आहे. 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवर ती अर्जुन आणि रणवीरपेक्षा जास्त उत्साही दिसत होती. शोच्या स्टेजवर प्रियांकाने तिच्या सिनेमाच्या 'अस्सलाम-ए-इश्कम' गाण्यातील डान्सच्या काही स्टेप्स करून दाखवल्या. यावेळी तिच्यासोबत शोचे ग्रँड मास्टर मिथुन चक्रवर्ती उपस्थित होते.
प्रियांकाने त्यावेळी काळ्या रंगाचे स्कर्ट आणि काळ्या आणि पांढ-या रंगाचे टॉप घातलेले होते. त्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. कानामध्ये तिने सोन्याचे मोठे-मोठे छुमके आणि हातात बांगड्या घातलेल्या होत्या.
यानिमित्ताने अर्जुन आणि रणवीर दोघेही सूट-बूटमध्ये दिसत होते. दोघे बरेच दिवसांपासून सारख्याच गेटअपमध्ये सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत 'डान्स इंडिय डान्स'च्या एपिसोडची काही छायाचित्रे ज्यामध्ये रणवीर, प्रियांका आणि अर्जुन यांनी त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा शोच्या सेटवर प्रियांका आणि इतर स्टार्सची धमाल-मस्ती...