आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या प्रियांका का रागाने झाली आहे लालबुंद ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोप्रा सध्या तिच्याबद्दल पसरलेल्या अफवांमुळे चांगली नाराज असून हैराणसुद्धा झाली आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या चर्चांनुसार प्रियांकाला आगामी 'गुंडे' हा सिनेमा तिची बहीण परिणीतीच्या शिफारसीवरुन मिळाला. शिवाय प्रियांकापूर्वी या सिनेमात लीड रोलसाठी अनुष्का शर्मा आणि परिणीती चोप्राला विचारणा झाली होती. मात्र अनुष्काकडे तारखा नसल्यामुळे तिने ही ऑफर नाकारली. त्यानंतर निर्मात्यांनी परिणीतीला या सिनेमासाठी विचारणा केली. मात्र परिणीतीनेही काही खासगी कारणामुळे हा सिनेमा नाकारला आणि या सिनेमासाठी प्रियांकाचे नाव निर्मात्यांना सुचवले. या सगळ्या अफवांमुळे प्रियांका रागाने चांगलीच लालाबुंद झाली आहे.

तसे पाहता प्रियांका चोप्रा बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवाय सिनेमाची ऑफर मिळवण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नसल्याचे प्रियांकाचे म्हणणे आहे. नाहीये.
'गुंडे'साठी परिणीती किंवा अनुष्काला विचारणा झाली नव्हती. या सिनेमासाठी प्रियांकालाच निर्मात्यांची पहिली पसंती असल्याचे समोर आले आहे.

यशराज बॅनरखाली तयार होत असलेल्या या सिनेमाचे शुटिंग मुंबईत सुरु असून यामध्ये प्रियांकाबरोबर रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर मेन लीडमध्ये आहेत. आदित्य चोप्रा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे.
असो, या अफवांमुळे प्रियांकाला मनस्ताप सहन करावा लागला हे नक्की.