आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझी प्रियंका..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये सध्या एकच हिरोइन चर्चेत आहे. ती म्हणजे प्रियंका चोप्रा. 2012 मध्ये तिच्या दोन सिनेमांनी शंभर कोटींच्या क्लबमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर तिचा आंतरराष्ट्रीय अल्बम आला. आता चर्चा आहे की, ‘शूट आउट अँट वडाला’मधील एका आयटम साँगसाठी तिला पावणेतीन कोटींची ऑफर मिळाली आहे. मात्र प्रियंकाने यात एक अट ठेवली आहे. तिचे म्हणणे आहे की, गाण्याचे बोल द्विअर्थी असायला नकोत आणि गाणे जास्त उत्तेजक असायला नको. गाण्याचे बोल ‘बबली बदमाश’ असे आहेत.

बालाजी मोशनच्या आगामी ‘मिलन टाकीज’ मध्येसुद्धा प्रियंका काम करत आहे. या सिनेमात तिचा हीरो इम्रान खान आहे. सिनेमाचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया करत आहेत. सध्या प्रियंका अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांच्याबरोबर ‘गुंडे’ सिनेमाच्या चित्रीकरणात कोलकातामध्ये व्यग्र आहे. यानंतर ती ‘क्रिश-3’ आणि बॉक्सर मेरी कोम यांच्यावर आधारित सिनेमात बिझीहोणार आहे. इतकी व्यग्र असूनही प्रियंका अनेक चॅरिटी कार्यक्रमात भाग घेताना दिसते. अलीकडेच ती आंतरराष्ट्रीय कलावंतांसोबत एका सामाजिक कार्यक्रमात दिसली होती.