आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Lost Salman Khan's Kick, Courtesy Shahrukh Khan

शाहरुख खानच्या जवळिकीमुळे प्रियंका ‘किक’ आऊट?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानच्या जवळिकीमुळे प्रियंका चोप्राच्या हातून ‘किक’ चित्रपट गेल्याची चर्चा आहे. सूत्रानुसार ‘किक’ चित्रपटात सलमान खान नायकाच्या भूमिकेत होता आणि प्रियंका चोप्रा नायिकेच्या भूमिकेत होती. निर्माता साजीद नाडियादवालाने परस्परच प्रियंकाला घेतले होते. याची माहिती सलमानला नव्हती. त्याला जेव्हा कळले की प्रियंका चित्रपटात आहे तेव्हा त्याने चित्रपट करण्यास नकार दिला होता. तेव्हा साजीदसमोर मोठी अडचण उभी राहिली.

प्रियंकासाठी तो सलमानला सोडू इच्छित नव्हता. म्हणून त्याने प्रियंकालाच न घेण्याचा निर्णय घेतला. साजीदने अनेक तारकांसोबत चर्चा केल्यानंतर शेवटी दीपिका पदुकोनला घेण्यात आले आहे. आता दीपिका सलमानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. प्रियंकाची शाहरुखसोबत चांगली मैत्री असल्याचे जगजाहीर आहे आणि सलमान-शाहरुख आणि त्याच्या मित्रापासून दूर राहणेच पसंत करतो. म्हणून प्रियंकाच्या हातून हा चित्रपट गेला. मात्र प्रियंकाची सलमानच्या बहिणीसोबत चांगली मैत्री आहे. याचा फायदा प्रियंकाला भविष्यात मिळू शकतो.