आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोशनवेळी घडली अशी घटना, की घाबरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपली प्रियांका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिनधास्त आणि टफ डिसीजन मेकर म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा घाबरुन आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपून बसली, हे जाणून नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल ना.
मात्र हैदराबादमध्ये आपल्या जंजीर या सिनेमाच्या तेलगू व्हर्जन तूफानच्या प्रमोशनवेळी तिला या स्थितीचा सामना करावा लागला.
झालं असं, की सिनेमाचा हीरो रामचरण तेजा हा दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याची फॅन फॉलोईंग बरीच मोठी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी सिनेमाचे प्रमोशन सुरु होते, ते स्टेडिअम लोकांनी गच्च भरले होते. एवढी गर्दी बघून प्रियांकाला अक्षरशः घाम फुटला.
रामचरणने प्रियांकाची काळजी घेत तिला आपल्या चाहत्यांच्या गर्दीतून सुरक्षित व्हॅनिटी व्हॅनपर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.