आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Replaces Sunny Leone As India's Most Dangerous Celebrity Online

प्रियांका चोप्राने सनी लिऑनला टाकले मागे, ठरली सर्वांत डेंजरस सेलिब्रिटी ऑनलाईन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांचा चोप्राने भारतीय इंटरनेट जगातिल सर्वांत डेंजरस सेलिब्रिटी ऑनलाईनचा किताब पटकाविला आहे. पॉर्नस्टार सनी लिऑनला मागे टाकून प्रियांकाने हा मान मिळविला आहे. त्यापाठोपाठ या यादित सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आघाडीचे स्थान पटकाविले आहे.

इंटरनेट आणि संगणकासाठी अॅण्टीव्हायरस तयार करणाऱ्या मेकॅफी या कंपनीने सर्वेक्षण करून ऑनलाईन डेंजरस सेलिब्रिटींची यादी तयार केली आहे. गेल्या वर्षी जिस्म 2 ची अभिनेत्री सनी लिऑनने या यादित पहिला क्रमांक पटकाविला होता. परंतु, या वर्षी बर्फी चित्रटातील अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिला मागे टाकले आहे. यंदा सनी लिऑन चक्क नवव्या स्थानावर राहिली आहे.

या यादित शाहरुख खानने दुसरा तर सलमान खानने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर करिना कपूर-खान तर पाचव्या स्थानावर अक्षय कुमार राहिले आहेत.

कसे झाले सर्वेक्षण, वाचा पुढील स्लाईडवर...