आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोप्रा कुटुंबीय शोकाकूल, बघा प्रियांकाची तिच्या वडिलांबरोबरची खास छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिया खानच्या आकस्मिक मृत्यूच्या धक्यातून बॉलिवूड सावरत असतानाच आता प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. 2008 सालापासून प्रियांकाचे वडील डॉ. अशोक चोप्रा कर्करोगाने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रियांका आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती. प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांका आपल्या वडिलांबरोबर दिसायची. मुलीला मिळत असलेल्या यशामुळे तिचे वडिलही आनंदी होते. प्रियांकाने आपल्या हातावर खास 'डॅडीज लिटील गर्ल' असा टॅटूही गोंदवून घेतला होता.
एक नजर टाकुया प्रियांका आणि तिच्या वडिलांच्या खास छायाचित्रांवर...