आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra's 'Exotic' Receives 30 Million Hits On Youtube

प्रियांकाच्या ‘एस्कोटिक’चा नवा विक्रम, यूट्युबवर मिळाल्या तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त हिट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या ‘एस्कोटिक’ या म्युझिक व्हिडिओने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. या अल्बमला युट्यूबवर तीन कोटींपेक्षा जास्त हिट मिळाल्या आहेत. प्रियांकाने यात अमेरिकन गायक रॅपर पिटबुल यांच्यासोबत गाणे म्हटले आहे. तिने गेल्या वर्षी इंग्रजी आणि हिंदीत हे गाणे म्हणत धूम केली होती.
31 वर्षीय प्रियांकाचे हे गाणे गेल्यावर्षी 11 जुलै 2013 रोजी रिलीज झाले होते. या गाण्याला आत्तापर्यंत 30,308,117 इतके हिट्स मिळाले आहेत. याशिवाय या गाण्याला लाइक करणा-यांची संख्या 1,27,935 इतकी आहे.
‘थॅक क्यू ऑल फॉर सपोर्ट अँड लव्ह’ असे ट्विट करत प्रियांकाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. या गाण्यात प्रियांकाने बिकिनी सीन्स देऊन अनेकांना चकित केले होते. सध्या ती अली अब्बास जफरच्या ‘गुंडे’ या सिनेमात काम करत आहे. यात तिच्यासोबत रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या बी टाऊनमधील आणखी काही रंजक घडामोडी...