आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra's Grueling 45 Days Training Schedule For Mary Kom

‘मेरी कोम’मुळे पीसी राहणार 60 दिवस व्यग्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दीड महिन्यात प्रियांका चोप्रा तिला उपलब्ध होणार्‍या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ‘गुंडे’ला प्रमोट करत होती. त्यामुळे असे वाटत होते की, ती काही दिवस आराम करेल. मात्र, असे होताना दिसत नाही. कारण प्रियांका दीर्घकाळ लांबलेल्या ‘मेरी कोम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. याचे एक शेड्युलदेखील पूर्ण झाले आहे. गेल्या दीड महिन्यापासून ती व्यायामापासून लांबच राहिली आहे.
बॉक्सरच्या भूमिकेसाठी ती शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. आधी तिला सुरुवातीच्या दहा दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. हे प्रशिक्षण दुसर्‍या शेड्युलच्या तयारीची सुरुवात असेल. हे प्रशिक्षण सुरूदेखील झाले आहे. दुसरे शेड्यूल 28 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ते 45 किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवसांचे असेल.
याबाबत प्रियंकाने सांगितले की, ‘या चित्रपटाचे आतापर्यंतचे प्रशिक्षण खूपच थकवणारे होते. ज्यावेळेस सेटवर पाय ठेवते तेव्हा अंग खूप दुखते. पुढील 55-60 दिवस मला कोणताही आराम मिळणार नाही.