आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बबली विरुद्ध पिंकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या प्रत्येक सिनेमात आयटम साँग दिसत आहे. आयटम साँगशिवाय सिनेमा चालणार नाही, अशी निर्मात्यांची धारणा झाली आहे. म्हणूनच मोठमोठ्या तारकासुद्धा आयटम साँग करायला तयार आहेत.

शीला आणि मुन्नीने धूम केल्यानंतर आता बबली बदमाश आणि पिंकी लोकांना वेड लावायला येत आहे. बबली म्हणजेच प्रियंका चोप्रा आपल्या आगामी सिनेमात आयटम साँग करणार आहे. अलीकडेच या गाण्याचे लाँचिंग मुंबईत करण्यात आले. या गाण्यामुळे आतापर्यंत आलेले सर्वच आयटम साँग मागे पाडणार असल्याची चर्चा आहे. कारण प्रियंकाने याची खूप तयारी केलेली आहे.

या वर्षी प्रियंकाचे दोन सिनेमे येत आहेत. 'शूटआउट अ‍ॅट वडाला'मध्ये ती ‘बबली’ आणि जंजीरमध्ये ती 'पिंकी' बोल असलेले आयटम साँग करणार आहे. त्यामुळे आता चिकनी चमेली, मुन्नी आणि फेव्हिकॉल सगळ्यांवरच मात केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र प्रियंका म्हणते की, मी कोणत्याच गाण्याशी माझी तुलना करणार नाही तर माझी तुलना माझ्याच गाण्याशी राहणार आहे. मला माझे दोन्ही आयटम साँग सगळ्यात चांगले करायचे आहेत. 'जंजीर' टीमच्या मते, प्रियंकाचे 'पिंकी' आयटम साँग लोकांना वेड लावणारे ठरणार आहे.